अकोल्याच्या अम्मार पटेल यांनी सीटीईटी परीक्षेत मिळवली उल्लेखनीय यश
अकोला, 13 मार्च, (हिं.स.) देशभरात घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये अकोल्यातील तरुण उमेदवार अम्मार पटेल यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या उत्तर कुंजीप्रमाणे अम्मार पटेल यांना 150 पैकी 104 गुण मि
Photo


अकोला, 13 मार्च, (हिं.स.) देशभरात घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये अकोल्यातील तरुण उमेदवार अम्मार पटेल यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या उत्तर कुंजीप्रमाणे अम्मार पटेल यांना 150 पैकी 104 गुण मिळाले असून, ते उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा लक्षणीय अधिक आहेत.

CTET परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 90 गुण आवश्यक असतात. अशा परिस्थितीत अम्मार पटेल यांनी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. देशभरातून लाखो उमेदवार या परीक्षेत सहभागी होत असल्याने स्पर्धा अत्यंत कठीण मानली जाते.

अम्मार पटेल यांचे स्वप्न शिक्षण क्षेत्रात पुढे जाऊन एक आदर्श शिक्षक बनण्याचे आहे. त्यांच्या मते, एक चांगला शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला आणि भविष्यास योग्य दिशा देण्याचे कामही करतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्याने अभ्यास केला आणि ही यशस्वी कामगिरी साध्य केली.

अम्मार पटेल यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय व मित्रपरिवाराने आनंद व्यक्त करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचेही मत आहे की अशा प्रकारच्या यशामुळे इतर युवकांना प्रेरणा मिळते आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधिक दृढ होते.

अम्मार पटेल यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या मेहनत आणि समर्पणामुळे हे स्पष्ट होते की ठाम ध्येय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande