अकोला : डॉ. भूषण फडके यांच्या ५० व्या श्रीरामकथा पुष्पाचा गुढीपाडव्यापासून प्रारंभ
अकोला, 13 मार्च (हिं.स.)।केवळ रामकथा ऐकण्यासाठी नाही, तर ती जगण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले आहेत. प्रभू श्रीरामांच्या नवरात्राचे औचित्य साधून निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने जठारपेठ येथील बिर्ला मंदिर येथे १९ ते २३ मार्च २०२६ या काळा
Photo


अकोला, 13 मार्च (हिं.स.)।केवळ रामकथा ऐकण्यासाठी नाही, तर ती जगण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले आहेत. प्रभू श्रीरामांच्या नवरात्राचे औचित्य साधून निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने जठारपेठ येथील बिर्ला मंदिर येथे १९ ते २३ मार्च २०२६ या काळात डॉ. भूषण फडके यांच्या ओजस्वी वाणीतून 'संगीत श्रीरामकथा' रंगणार आहे. यंदाचे हे डॉ. फडके यांच्या कथेचे ५० वे पुष्प असून,निलेश देव मित्र मंडळाच्या आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. रामायणातील प्रसंगांची महाराष्ट्रातील थोर संत परंपरांशी घातलेली गुंफण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.

पाच दिवसांचा 'भक्ती ते शक्ती' प्रवास: दररोज संध्याकाळी ६.३० ते ९ या वेळेत होणाऱ्या या कथेत रामायणातील प्रत्येक कांडाचा संबंध एका विशिष्ट संत परंपरेशी जोडला गेला आहे:

१९ मार्च (बालकांड व वारकरी परंपरा): मर्यादा पुरुषोत्तमाचा जन्म आणि ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम महाराजांच्या 'नामभक्ती'चा मिलाफ.

२० मार्च (अयोध्याकांड व रामदासी परंपरा): श्रीरामांचा त्याग आणि समर्थ रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज व सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या 'विवेक' आणि 'कर्तव्य' विचारांचा वारसा.

२१ मार्च (अरण्य-किष्किंधाकांड व दत्त परंपरा): दंडकारण्यातील ऋषी भेटी आणि दत्त परंपरेतील अवतारांचे 'अभय' आणि 'गुरुनिष्ठा'.

२२ मार्च (सुंदरकांड व गजानन महाराज): हनुमंताचे अफाट सामर्थ्य आणि शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची ' व योगशक्ती

२३ मार्च (युद्धकांड व रामराज्य): अधर्माचा नाश, विजयाचा जल्लोष आणि 'रामराज्या'च्या संकल्पनेचा भव्य समारोप.

या संगीत कथेत डॉ. भूषण फडके यांना सौ. वैशाली फडके, प्रा. निखिल देशमुख, हार्दिक दुबे, सुमंत तर्हाळकर, विघ्नेश बोकसे आणि देवाशिष फडके हे कलावंत साथसंगत करणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने 'स्व. अंबरिश कविश्वर युवा पत्रकार पुरस्कार' दि. २३ मार्च २०२६ रोजी प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ पत्रकार महेंद्रजी कविश्वर, निलेशजी जोशी आणि मिलिंदजी गायकवाड या समितीच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या नावावर या पुरस्काराची मोहर उमटवली जाईल, असे निलेश देव यांनी कळविले आहे.

तर दि. २४ मार्च रोजी सौ. सई सुयोग रानडे यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली 'रामायण नृत्यनाटिका' सादर केली जाईल.

रामकथा अनेकदा ऐकली असेल, पण यावेळी ती संत विचारांच्या प्रकाशात अनुभवायची आहे, असे आवाहन आयोजक निलेश देव यांनी केले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande