
छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च (हिं.स.)।
स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तू खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे “अमृत पेठ २०२६” या भव्य उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १४ व १५ मार्च रोजी शिवम मंगल कार्यालय, छप्पन भोग हॉटेलच्या पाठीमागे, छत्रपती नगर, देवळाई चौक, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेने हे पाऊल उचलले आहे. छत्रपती संभाजीनगरकरांनी जास्तीत जास्त भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वदेशी बाजारपेठ या संकल्पनेअंतर्गत आयोजित या मेळाव्यात स्थानिक उद्योजक, महिला बचत गट तसेच नवउद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे तसेच दैनंदिन वापराच्या विविध वस्तूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे नागरिकांना थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार असून स्थानिक व स्वदेशी उत्पादनांना चालना मिळेल.
हा मेळावा वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
या मेळाव्याला नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक
9404593726 / 7709080073 यावर संपर्क साधावा ,असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis