आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण जगाचे नायक बना : डॉ. सूर्यकांत जोगदंड
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण जगाचे आकलन करून घेण्यासाठी पदवी ही केवळ मान्यता नसून बदलत्या काळाशी सुसंगत विचार, विवेक, विज्ञान व तंत्रज्ञानाची महती आत्मसात करून ज्ञानमयी जगाचे शिल्पकार बनावे, असे आवाहन स्वामी रामानंद
Become a hero of a world full of modern technology: Dr. Suryakant Jogdand


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण जगाचे आकलन करून घेण्यासाठी पदवी ही केवळ मान्यता नसून बदलत्या काळाशी सुसंगत विचार, विवेक, विज्ञान व तंत्रज्ञानाची महती आत्मसात करून ज्ञानमयी जगाचे शिल्पकार बनावे, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड यांनी केले.

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी येथे परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित पदवी वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणीचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कला विद्या शाखा) प्रा. प्राचार्य डॉ. अजयराव टेंगसे, प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. आशा गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभात एकूण 144 विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी हेमंतराव जामकर यांच्या हस्ते डॉ. सूर्यकांत जोगदंड व डॉ. अजयराव टेंगसे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी अध्यक्ष हेमंतराव जामकर यांचा सत्कार केला, तर प्रा. अरुण पडघन यांनी प्राचार्य डॉ. भिसे यांचे स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande