रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांची शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला आज भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला. घरगुती गॅसचा पुरवठा २५ दिवसांत झाला पाहिजे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. ब
रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांची शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट


रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला आज भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला.

घरगुती गॅसचा पुरवठा २५ दिवसांत झाला पाहिजे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. बुकिंगसाठी ग्राहकांनी व्हॉट्स ॲपचा वापर करावा. ग्राहकांनी अजिबात संतप्त होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी यावेळी गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाला बुकिंगसंदर्भात माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना दिली. त्याचबरोबर ग्राहकांचे येणारे फोन घेऊन, त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावीत. त्यांच्या शंकांचे निरसन करावे. त्याचबरोबर बुकिंगची यादी कमी करण्याबाबत नियोजन करावे. ग्राहकांना 25 दिवसांत गॅस सिलिंडर मिळाले पाहिजे, अशी सूचनाही दिली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शांतादुर्गा गॅस एजन्सीला आज भेट देऊन पाहणी व पडताळणी केली. ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरत आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त होत आहेत. त्यासाठी नागरिकांशी संवाद साधला. जिल्ह्यामध्ये शासन चांगल्या प्रकारे गॅस पुरवठा करत आहे. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत ४५ दिवसांची बातमी समाजमाध्यमांवर पसरत आहे. ती चुकीची आहे. शासनाचे निर्देश आहेत की, प्रत्येक ग्राहकापर्यंत २५ दिवसांमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा झाला पाहिजे. त्यानुसार आम्ही सर्व गॅस एजन्सींना २५ दिवसांत गॅस पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. ४५ दिवसांबाबत एजन्सीमध्ये येत असलेली तांत्रिक अडचण आजच निकाली निघेल. त्यामुळे ग्राहकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. ग्राहकांनी आपल्या समस्यांसाठी 7057222233 या जिल्हा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर सिलिंडर बुकिंगसाठी गॅस एजन्सीजच्या व्हॉट्स ॲप क्रमांकांचा वापर करावा. त्याबाबतची माहिती ग्राहकांच्या गॅस बुकमध्ये दिली आहे. शिवाय याबाबतची माहिती ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वच गॅस एजन्सींनी दर्शनी भागात फलक लावावेत, अशी सूचनाही दिल्याचे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande