
लातूर, 13 मार्च, (हिं.स.)। केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज देवणी तालूका व शहर व काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील बोरोळ चौकात अत्यंत आक्रमक घोषणाबाजी करुन अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरला चक्क 'फासावर लटकावून केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी देवणी तालूका अध्यक्ष ॲड अजित बेळकोणे, निलंगा विधानसभा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बालाजी वळसांगवीकर. शहराध्यक्ष जावेद तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष मालबा घोणसे. युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शरण लुल्ले. अनिल पाटील जवळगेकर जिल्हा परिषद सदस्य औदुंबर पांचाळ. पंचायत समितीचे सदस्य नागनाथ सगर.सुखानंद काळशेट्टे नगराध्यक्षा सौ किर्तीताई घोरपडे. गटनेत्या मळभगे ताई. उपनगराध्यक्ष अमित मानकरी. रमेश कोतवाल. नगरसेविका घोलपे ताई. महिला तालूका अध्यक्षा प्रेरणाताई जाधव यांच्यासह अनेक नगरसेवक, महिला आघाडीच्या पदाधिकारी, विविध फ्रंटल सेलचे अध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis