दिव्यांग लाभार्थ्यांनी ६ दिवसांत ‘यूडीआयडी’ कार्ड जमा करावे अन्यथा अनुदान बंद होणार
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. ज्या
दिव्यांग लाभार्थ्यांनी ६ दिवसांत ‘यूडीआयडी’ कार्ड जमा करावे अन्यथा अनुदान बंद होणार


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप आपले कार्ड (युनिक आयडेंटिटी कार्ड) आणि ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र तहसील कार्यालयात सादर केलेले नाही, त्यांनी पुढील ६ दिवसांत ही कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास शासनाकडून मिळणारा लाभ बंद होऊ शकतो, असा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे.

राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागामार्फत डिसेंबर २०२४ पासून या सर्व योजनांचे अनुदान पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी वारंवार सूचना देऊनही अद्याप आपली अद्ययावत कागदपत्रे (UDID कार्ड व ऑनलाइन प्रमाणपत्र) प्रशासनाकडे जमा केलेली नाहीत

दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सचिव, दिव्यांग मंत्रालय, मुंबई आणि ६ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी, परभणी यांच्यासोबत झालेल्या 'व्हीसी'मध्ये (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) या विषयावर कडक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, सर्व संबंधित लाभार्थ्यांनी सहा दिवसांच्या आत आपली कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप आपली कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी विहित मुदतीत ती जमा करावीत. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यामुळे जर शासनाकडून मिळणारा लाभ बंद झाला, तर त्याला सर्वस्वी लाभार्थी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.

— तहसीलदार, सेलू .

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande