परभणीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे १६ व १७ मार्चला आयोजन
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य २०२६ निमित्त जिल्हास्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दि. १६ व १७ मार्च २०२६ रो
परभणीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे १६ व १७ मार्चला आयोजन


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य २०२६ निमित्त जिल्हास्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दि. १६ व १७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

महोत्सव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, वैद्यनाथ वसतिगृह शेजारील मैदान, परभणी येथे पार पडणार आहे. महोत्सवात कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन, परिसंवाद व चर्चासत्र, तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी व प्रकल्प संचालक आत्मा, यांच्या वतीने करण्यात आले असून शेतकरी, महिला शेतकरी व नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande