डॉ. हरिहर कौसडीकर यांची भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जनरल बॉडीवर शास्त्रज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद या देशातील सर्वोच्च कृषी संशोधन संस्थेच्या जनरल बॉडीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कृष्णराव कौसडीकर यांची शास्त्रज
डॉ. हरिहर कौसडीकर यांची भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जनरल बॉडीवर शास्त्रज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद या देशातील सर्वोच्च कृषी संशोधन संस्थेच्या जनरल बॉडीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कृष्णराव कौसडीकर यांची शास्त्रज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषद सोसायटीची जनरल बॉडी ही परिषदेची सर्वोच्च संस्था असून तिचे अध्यक्ष केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री असतात. या संस्थेमध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, नामवंत शास्त्रज्ञ तसेच शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असतो. देशातील कृषी शिक्षण, संशोधन आणि धोरणात्मक नियोजनाला दिशा देणे, प्रगतीचा आढावा घेणे तसेच भावी धोरणे निश्चित करणे ही या संस्थेची प्रमुख जबाबदारी आहे.

या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. कौसडीकर यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. हरिहर कौसडीकर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात उपसंचालक (संशोधन) तसेच मृद विज्ञान विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कृषी शिक्षण, संशोधन, नियोजन, व्यवस्थापन तसेच कृषी विस्तार क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारत सरकारने देशातील 74 कृषी विद्यापीठांमधून त्यांची या महत्त्वपूर्ण समितीवर निवड केली आहे. कृषी परिषद, पुणे येथे कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण विभागाच्या संचालक पदांचा अनुभव तसेच मृदविज्ञान विषयातील त्यांच्या संशोधन कार्याचा देशातील कृषी शिक्षण व संशोधनाच्या विकासासाठी उपयोग होणार असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande