
छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च (हिं.स.)।
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीच्या सौ. अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची निवड झाली .जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झालेल्या निवड प्रक्रियेत ५५ पैकी तब्बल ४५ मते महायुतीला मिळाली.
सौ. अर्चना पाटील यांच्या रुपाने इतिहासात प्रथमच धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला मिळाले आहे. ही बाब ऐतिहासिक, अभिमानास्पद आहे. हा विजय महायुतीच्या भक्कम एकजुटीचा, विकासाभिमुख विचारसरणीचा आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे.
त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होईल, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे निर्णय अधिक वेगाने पुढे जातील, असा विश्वास आहे.
महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अधिक बळ मिळत असून, धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा आणि नवे बळ मिळेल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis