जळगाव - जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 16 मार्च रोजी आयोजन
जळगाव, 13 मार्च, (हिं.स.) जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवार 16 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे. समस्याग्रस्त
जळगाव - जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 16 मार्च रोजी आयोजन


जळगाव, 13 मार्च, (हिं.स.) जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवार 16 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्यानुसार 16 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande