नंदुरबार - जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा - धनंजय गोगटे
नंदुरबार, 13 मार्च (हिं.स.) नंदुरबार जिल्ह्यातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धनंज
नंदुरबार - जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा - धनंजय गोगटे


नंदुरबार, 13 मार्च (हिं.स.) नंदुरबार जिल्ह्यातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही

कारण नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत

सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत पसरणाऱ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली असून जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्याचा सूक्ष्म पातळीवरसातत्याने आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल (HPCL) आणि आयओसीएस (IOCL)

या प्रमुख कंपन्यांच्या समन्वयाने पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू

ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आपत्कालीन स्थितीसाठी प्रशासनाकडे पुरेसा राखीव साठा देखील

उपलब्ध असून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह

‘भरारी पथके’ तैनात करण्यात आली आहेत. ही पथके अचानक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई

करतील . नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू

नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande