परभणी - सुशिक्षित बेरोजगारांसाठी पाथरी येथे 17 मार्चला रोजगार मेळावा
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने दि. 17 मार्च, 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि वाल्मिकी शिक्
परभणी - सुशिक्षित बेरोजगारांसाठी पाथरी येथे 17 मार्चला रोजगार मेळावा


परभणी, 13 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने दि. 17 मार्च, 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांताबाई नखाते विद्यालय, शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालय येथे “पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजीत करण्यात आला आहे.

या मेळाव्यास राज्यातील विविध नामांकित मोठे उद्योजक /कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डीप्लोमा, पदवी इत्यादी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, क्षेत्र अधिकारी, विमा सखी, इत्यादी पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी वेतन 10 ते 25 हजार असणार आहे. तद्नंतर अनुभवावरुन वेतनामध्ये वाढ होऊ शकते तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत शासकीय/निमशासकीय/खाजगी कार्यालयामध्ये प्रशिक्षण व आर्थिक लाभासह अनुभव प्रमाणपत्र देखील मिळते.

महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांनी नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या (mahaswayam.gov.in) या वेबसाईटवर करावी. नाव नोंदणीची सुविधा महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे. महारोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नाव नोंदणी करण्यासाठी दि. 17 मार्च रोजी शांताबाई नखाते विद्यालय, शिवाजी नगर पाथरी येथे स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहावे.

जिल्ह्यातील जास्तीतजास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande