त्र्यंबकेश्वर येथील भाविक मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश
प्रशासनाकडून ट्रस्टच्या कारभाराची चौकशी नाशिक, 13 मार्च (हिं.स.)। - श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातच भाविकाला झालेल्या मारहाणीच्या ने प्रकरणाची दखल जिल्हा व सत्र न्यायालयाने घेतली असून, आता न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची स्व
Judicial inquiry ordered into


प्रशासनाकडून ट्रस्टच्या कारभाराची चौकशी

नाशिक, 13 मार्च (हिं.स.)।

- श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातच भाविकाला झालेल्या मारहाणीच्या ने प्रकरणाची दखल जिल्हा व सत्र न्यायालयाने घेतली असून, आता न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी दिल्याने आता या प्रकरणाच गांभीर्य वाढले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात हरियाणाच्या भाविकांना कपडे फाटेपर्यंत गंभीर मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर १ मार्च रोजीच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे प्रकरण चांगलेच चिघळले. थेट मुख्यमंत्र्यांनीच याची दखल घेत दोषींवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यासोबतच देवस्थान प्रशासन आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांतील काहींवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबितही करण्यात आले. दरम्यान त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पवन दत्ता यांची समिती विभागीय आयुक्तांच्या आदेशाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नियुक्त केली. या समितीला २१ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्हीही अहवालानंतर कारवाई आणि दर्शनाबाबत धोरणात्मक निर्णय घेतले जातील.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या आदेशाने नाशिक येथील द्वितीय कनिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी (न्यायालय क्रमांक १) तसेच त्र्यंबकेश्वर ग्राम न्यायालयाचे न्यायाधिकारी . के. एम. चंदालिया यांची या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे

त्र्यंबक ट्रस्टच्या कारभाराचाच पंचनामा सुरु

प्रांताधिकारी दत्ता यांनी आता ट्रस्टच्या कारभाराचा पंचनामा सुरू केला आहे. त्यातील व्हीव्हीआयपी पासमधून येणारे उत्पन्न, कुणाला पासेस दिले, कुणी विनापास प्रवेश केला, देणग्या आणि त्या प्रमाणात देण्यात येणाऱ्या सुविधांची तपासणी सुरू केली आहे. यात मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये काही प्रमाणात फेरफार केल्याचेही आढळल्याचे दिसून आले आहे. त्यांनी कलम १५ नुसार या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande