मनमाडच्या लेकीची जिद्द! आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून ज्योत्स्नाची परीक्षेला हजेरी
गुरुजींनी निभावली पित्याची भूमिका मनमाड, 13 मार्च (हिं.स.)। :आई नावाचं छत्र हरपल्यानंतर आभाळ कोसळल्यासारखं दुःख पदरी आलेलं असतानाही, मनमाडमधील एका धाडसी मुलीने आपल्या अश्रूंना बांध घालत धैर्याने दहावीची परीक्षा दिली. आईच्या निधनाचं दुःख मनात स
determination


गुरुजींनी निभावली पित्याची भूमिका

मनमाड, 13 मार्च (हिं.स.)।

:आई नावाचं छत्र हरपल्यानंतर आभाळ कोसळल्यासारखं दुःख पदरी आलेलं असतानाही, मनमाडमधील एका धाडसी मुलीने आपल्या अश्रूंना बांध घालत धैर्याने दहावीची परीक्षा दिली. आईच्या निधनाचं दुःख मनात साठवून, केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संत बार्णबा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी जोसेफ ज्योत्स्ना विनोद हिने दाखवलेल्या या जिद्दीमुळे संपूर्ण परिसरात तिचे कौतुक होत आहे.या सगळया कामात शाळेचे मुख्याध्यापक विकास कराड व इतर शिक्षक व शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांनी मदत केली जोत्सनाच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

ज्योत्स्नाचा दहावी बोर्डाचा महत्त्वाचा विज्ञान विषयाचा पेपर होता. मात्र, परीक्षेच्या काही तास आधीच तिच्या आईचे निधन झाले. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, सर्वत्र शोककळा पसरली होती. अशा स्थितीत कोणत्याही विद्यार्थ्याला स्वतःला सावरणं कठीण असतं.या घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक कराड सर, शिक्षक रसाळ सर आणि संदीप दादा यांनी तात्काळ ज्योत्स्नाच्या घरी धाव घेतली. कुटुंबाचे सांत्वन करत त्यांनी ज्योत्स्नाला धीर दिला. तुझ्या आईची हीच इच्छा असती की तू शिकावं आणि मोठं व्हावं, असे म्हणत शिक्षकांनी तिचे मनोबल वाढवले. ज्योत्स्नाने अत्यंत कठीण निर्णय घेत आईच्या निधनाचे दुःख मनात दाबून परीक्षा देण्याचे ठरवले.यावेळी शिक्षकांनी तिला धीर दिला व स्वतः परीक्षा केंद्रावर सोडवले परीक्षा संपल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्याध्यापकांनी स्वतः सोडले परीक्षा केंद्रावर

केवळ सांत्वन करून न थांबता, मुख्याध्यापक विकास कराड सर यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी स्वतःच्या गाडीतून ज्योत्स्नाला परीक्षा केंद्रावर पोहचवले. डोळ्यात अश्रू आणि मनात आईची आठवण असतानाही ज्योत्स्नाने पूर्ण जिद्दीने विज्ञानाचा पेपर सोडवला.दुःखाच्या डोंगराखाली न दबल्या गेलेल्या ज्योत्स्नाची शिक्षणाप्रती असलेली ही निष्ठा आणि शाळेच्या शिक्षकांनी दाखवलेली संवेदनशीलता पाहून आज प्रत्येक मन हेलावले आहे. तिच्या या धैर्याला संपूर्ण मनमाड शहर सलाम करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande