
परभणी, 13 मार्च (हिं.स.)।
गंगाखेड पंचायत समिती सभापतीपदी मनोज लक्ष्मणराव मुंडे यांची तर उपसभापतीपदी सौ. सारिका रमेशराव खांडेकर यांची निवड झाली आहे. सभापती मनोज मुंडे हे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे समर्थक असून जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव मुंडे यांचे चिरंजीव आहेत.
पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी मनोज लक्ष्मणराव मुंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी सौ. सारिका खांडे यांची निवड झाली. निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निवडणुकीच्या वेळी पंचायत समिती सदस्य तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis