परभणी - मोजे वरपूड येथे भव्य पशुरोग निदान, उपचार व लसीकरण शिबिर; 281 जनावरांचे लसीकरण
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। भव्य पशुरोग निदान, उपचार व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर पशुवैद्यकीय चिकित्सालय पिंगळी, पशुविज्ञान महाविद्यालय परभणी व कै. अंबादासराव वरपूडकर कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले हो
Massive animal disease diagnosis, treatment and vaccination camp at Moje Varpud; 281 animals vaccinated


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

भव्य पशुरोग निदान, उपचार व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर पशुवैद्यकीय चिकित्सालय पिंगळी, पशुविज्ञान महाविद्यालय परभणी व कै. अंबादासराव वरपूडकर कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सुशील वरपूडकर यांच्या हस्ते गौपूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुप्रजनन विभाग प्रमुख डॉ. सौ. मंजुषा पाटील या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पशुशस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. शरद चेपटे, पशुवैद्यकीय औषध विभागाचे डॉ. पंकज हसे आणि डॉ. सय्यद मुजीब उपस्थित होते.

यावेळी डॉ. शरद चेपटे यांनी पशुकर्क रोगाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. पंकज हसे यांनी जंतनिर्मूलन व लसीकरणाचे महत्त्व सांगितले. डॉ. सय्यद मुजीब यांनी लाळ्या-खुरकूत रोगाची कारणे, लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय याबाबत माहिती दिली. तर डॉ. मंजुषा पाटील यांनी पशुप्रजनन व्यवस्थापन व पशुवंधत्व निवारण यावर मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये एकूण 281 जनावरांना लाळ्या-खुरकूत रोगाची लस देण्यात आली. तसेच 4 शस्त्रक्रिया, 18 गर्भधारणा तपासण्या व 14 पशुवंधत्व निवारण उपचार करण्यात आले. उपस्थित पशुपालकांना जंतनिर्मूलनाच्या गोळ्या व खनिज मिश्रणाचेही वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande