
लातूर, 13 मार्च (हिं.स.)।लातूर जिल्हा हॉटेल असोसिएशन लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना शहरातील हॉटेल मालकांचे एक शिष्टमंडळ निवेदन देऊन आले ,,,सध्या गॅस एजन्सीने हॉटेल व्यवसायिकांना कमर्शियल गॅस द्यायचे बंद केले आहे, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यवसायिकावर मोठे संकट आलेला आहे ,,एक-दोन दिवस पुरेल एवढा साठा असल्याने नंतर बहुसंख्य हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सांगितले.
सरकारचे आदेशानुसार जीवनावश्यक म्हणजे वस्तीगृह, सरकारी हॉस्पिटलच्या कॅन्टीन, बालकाश्रम बालसुधारग्रह या ठिकाणी कमर्शियल गॅस सिलेंडर द्यावे असे आदेश असल्याने त्यामुळे हॉटेल व्यवसायिकावर खूप मोठे संकट निर्माण झाले आहे काहींनी तर पुन्हा चुली पेटवले आहेत,, चुली शिवाय आता पर्याय नाही परंतु हॉटेलमधील काही पदार्थ चुलीवर बनवू शकत नाहीत त्यांना प्रेशरचा गॅस लागतो त्यामुळे जे चुलीवर बनेल तेच ग्राहकांना आता खावे लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदरील निवेदन नगरसेवक प्रवीण कस्तुरे, नंदकिशोर अग्रवाल, प्रसाद उदगीरकर ,महेश सुडे, गणेश थोरमोटे, संदेश बरुरे राज बरुरे, प्रशांत धायगुडे आदित्य सोनवणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis