
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : आरोग्य कुटुंब प्रशिक्षण केंद्र (कोल्हापूर) यांच्यामार्फत येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सोमवारी, दि. 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्याशाळेकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी