विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मातेची चंदनउटी पूजेची ऑनलाइन नोंदणी सुरू
सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्र प्रारंभ होईपर्यंत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची पारंपरिक चंदनउटी पूजा केली जाते.
Vithal


सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)।

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्र प्रारंभ होईपर्यंत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची पारंपरिक चंदनउटी पूजा केली जाते. ग्रीष्म ऋतूमध्ये श्रींच्या मूर्तींना चंदनउटी पूजा केली जाते.

चंदनउटी पूजेचा कालावधी १९ मार्च ते ८ जून असा निश्चित करण्यात आला आहे. श्रींच्या पोशाखानंतर दुपारी ४.३० ते ५.१५ या वेळेत पूजा करण्यात येणार आहे. या पूजेसाठी घरबसल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया चालू असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पूजांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे पूजेची नोंदणी करता येणार आहे. https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande