गंगाखेड येथील पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 83 उमेदवारांची प्राथमिक निवड
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व श्री संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञा
गंगाखेड येथील पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 83 उमेदवारांची प्राथमिक निवड


परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व श्री संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथे “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, बी.ई., पॉलिटेक्निक आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदी मिळून एकूण 200 पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मेळाव्यास 166 सुशिक्षित बेरोजगार उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 83 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगाखेडचे प्राचार्य बी. एम. धूत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले. नवयुगात तंत्रज्ञान, डिजिटल क्षेत्र, हरित ऊर्जा व आरोग्यसेवा क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून आयटी, एआय, डेटा ॲनालिटिक्स, सायबर सुरक्षा तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) तंत्रज्ञान यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर्मनी व इस्त्रायलसारख्या देशांमध्येही कुशल कामगारांना संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयटीआय, तांत्रिक व कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे उद्योगसुसंगत रोजगाराच्या संधी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande