
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी मार्फत सेलू येथील साई बाबा मंदिर महेश नगर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला.
जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डीप्लोमा, पदवी, इत्यादी शैक्षणीक पात्रता धारक उमेदवारांसाठी ट्रेनी ऑपरेटर, क्षेत्र अधिकारी, विमा सल्लागार, विमा सखी, मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम प्रशिक्षणार्थी इत्यादी 150 पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मेळाव्यास 136 सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 37 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे, समर्थ स्किल अकॅडमी सेलूचे गजानन गाथ, कै ममतारामजी काटकर जनहित प्रतिष्ठान सेलूचे बाबा काटकर, सायली स्किल डेव्हपमेंट सेलूचे गोपाल थोरात उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis