रत्नागिरी : आर. टी. ई. २५ टक्के प्रवेशासाठी 18 मार्चपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (R.T.E.), मधील कलम (12) (एक) (सी) नुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये आर.टी. ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता 18 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रिये
रत्नागिरी : आर. टी. ई. २५ टक्के प्रवेशासाठी 18 मार्चपर्यंत मुदतवाढ


रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (R.T.E.), मधील कलम (12) (एक) (सी) नुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये आर.टी. ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता 18 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या प्रक्रियेअंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना सन 2026-27 या वर्षासाठी 804 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) कडून 17 फेब्रुवारी ते 10 मार्च कालावधीमध्ये आपल्या पाल्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र www.student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, आर. टी. ई. २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज www.student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर भरण्यासाठी बुधवार 18 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शिक्षक संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज www.student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अचूक माहितीसह भरावेत, असे पुन्हा एकदा आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande