सफाई कर्मचाऱ्यांना मुलभूत हक्क व योजनांचा लाभ वेळेत देण्यात यावा : आयोगाचे अध्यक्ष
परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। सफाई कर्मचारी हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी स्वच्छतेच्या माध्यमातून ते महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळणे गरजेचे असून शासन निर्णयानुसार सफाई कर्
सफाई कर्मचाऱ्यांना मुलभूत हक्क व योजनांचा लाभ वेळेत देण्यात यावा : आयोगाचे अध्यक्ष


परभणी, 13 मार्च, (हिं.स.)। सफाई कर्मचारी हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी स्वच्छतेच्या माध्यमातून ते महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळणे गरजेचे असून शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभासह त्यांच्या कुटुंबियांच्या प्रगतीसाठी वेळेवर लाभ देण्यात याव्यात, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यानी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सफाई कामगारांच्या अडचणी व प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डागोर बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी, विभागप्रमुख, सफाई कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. समितीनुसार प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची सूचना श्री. डागोर यांनी केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी. शिबीराच्या माध्यमातून त्यांना आयुष्मान कार्ड देण्यात यावे. श्रमसाफल्य आवास योजनेतंर्गत त्यांना घरकुल द्यावे. समाजकल्याण योजनेच्या माध्यमातून त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ द्यावा. महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाने पाल्यांना उद्योगांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावे. सफाई कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देण्यात यावी. तसेच साप्ताहिक सुटीचा लाभ, नियमित वेतन, निवृत्तीधारकांना प्रलंबित लाभ देण्यात यावेत, असे निर्देश डागोर यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रशासन प्रभावीपणे कार्य करेल. येत्या तीन महिन्यांत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही दिली. प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके आणि नगर पालिका प्रशासनाचे अधिकारी महेश गायकवाड यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande