पारंपारिक शिवकालीन खेळांचा गौरव; खेळाडूंसह ६० मान्यवरांचा ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मान
सोलापूर, 13 मार्च, (हिं.स.)। सोलापूर पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या महिला खेळाडूंसह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० मान्यवरांचा ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा जुना विडी घरकुल येथील क
gfd


सोलापूर, 13 मार्च, (हिं.स.)। सोलापूर पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या महिला खेळाडूंसह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० मान्यवरांचा ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा जुना विडी घरकुल येथील कै. प्रकाश तुकाराम सोमा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

योंगमुडो, दांडपट्टा आणि लाठी-काठी या पारंपारिक खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक, मार्गदर्शक तसेच महिला खेळाडूंचा आदर्श-सर्वोत्कृष्ट खेळाडू, आदर्श प्रशिक्षक व मार्गदर्शक या विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्र, विडी घरकुल येथील महिला खेळाडूंनी वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम कन्या फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने धनश्री विविध विकास संस्था, रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि योंगमुडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande