साेलापुरातील सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई
सोलापूर, 13 मार्च, (हिं.स.)। जून ते जुलै २०२५ या कालावधीत बदली होऊनही नवीन ठिकाणी १७ ग्रामसेवक रुजू झाले नव्हते. सर्व १७ जणांना रुजू न झाल्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटीस दिल्यानंतर १० ग्रामसेवक पदभार सोपवून नवीन ठिकाणी रुजू झाले.पण ७ ग
साेलापुरातील सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई


सोलापूर, 13 मार्च, (हिं.स.)। जून ते जुलै २०२५ या कालावधीत बदली होऊनही नवीन ठिकाणी १७ ग्रामसेवक रुजू झाले नव्हते. सर्व १७ जणांना रुजू न झाल्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटीस दिल्यानंतर १० ग्रामसेवक पदभार सोपवून नवीन ठिकाणी रुजू झाले.पण ७ ग्रामसेवक अद्याप रुजू झाले नाहीत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सातही ग्रामसेवकांची माहिती मागवली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बदली प्रक्रियेत एकाच ठिकाणी सहा ते १० वर्षांपर्यंत नियुक्त असलेल्या ग्रामसेवकांची बदली करण्यात आली, पण यातील अनेक ग्रामसेवक नवीन ठिकाणी रुजूच झाले नाहीत. नोटीस दिल्यानंतर १० ग्रामसेवक रुजू झाले आहेत.तर ७ ग्रामसेवक अद्याप रुजू झाले नाहीत. यामुळे सातही ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या सात ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande