सैनिक कल्याण विभाग; लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रकात बदल
छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च (हिं.स.)। सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता परीक्षा २३ मार्च रोजी होणार आहे. सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदांसाठी भरती हो
सैनिक कल्याण विभाग; लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रकात बदल


छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च (हिं.स.)।

सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता परीक्षा २३ मार्च रोजी होणार आहे.

सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा शनिवार दि.१४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत होणार आहे,असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले होते. तथापि आता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला असून आता ही परीक्षा सोमवार दि.२३ मार्च रोजी दुपारी १ ते ३ यावेळात होणार आहे,असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande