हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; घाबरण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च, (हिं.स.) अमेरिका-इराण यांच्यात युद्ध सुरू असले तरीही जिल्ह्यात पुरेसा गँस सिलेंडरचा साठा असून, नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हावासीयांना केले आहे. जिल्ह्यातील गँस वितरणात
हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; घाबरण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी


छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च, (हिं.स.) अमेरिका-इराण यांच्यात युद्ध सुरू असले तरीही जिल्ह्यात पुरेसा गँस सिलेंडरचा साठा असून, नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

जिल्ह्यातील गँस वितरणात गॅस पुरवठा स्थिती सध्या पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून जाण्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात एकूण १३ गॅस एजन्सी कार्यरत असून एकूण ३,७४,४७८ ग्राहकांना गॅस पुरवठा केला जात आहे. सध्या ४,४३५ घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करताना रुग्णालये, वसतिगृहे तसेच इतर शासकीय संस्थांना प्राधान्य दिले जात आहे.

तसेच गॅस प्लांटमध्ये घरगुती सिलिंडरचा सुमारे ३ दिवसांचा बफर साठा उपलब्ध आहे. वितरकांकडेही सुमारे दीड दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याने पुरवठा सुरळीत सुरू आहे. सध्याची परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून न जाता नियमितपणे गॅसचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande