परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा: पुरेसा साठा उपलब्ध
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, अस
परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा: पुरेसा साठा उपलब्ध


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच घरगुती गॅसचा अनधिकृत वापर व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांच्या माध्यमातूनही धडक मोहिम राबविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

मध्यपूर्व आशियात सध्या सुरु असलेल्या युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम (बी.पी.सी. एल), हिंदुस्थान पेट्रोलियम (एच. पी. सी.एल.) इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (आय.ओ.सि.एल.) या तीनही कंपन्यांच्या विक्री अधिकारी तसेच जिल्ह्यातील संबधित कंपन्यांचे गॅस व पेट्रोल वितरक यांचाकडून आढावा घेतला.

परभणी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, तसेच एल.पी.जी. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल, असे संबधित गॅस वितरकांकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

गॅस कंपन्यांकडून घरगुती एल.पी.जी. सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक केले असून, पहिला सिलेंडर घेतलेपासून 25 दिवस झाल्याशिवाय दुसरा गॅस सिलेंडर बुकिंग करता येणार नाही, असे बदल प्रणालीमध्ये केलेले आहेत. त्यामुळे 25 दिवसानंतरच दुस-या सिलेंडरचे नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी नागरिकांना आवाहन करणेत येते कि, जिल्ह्यात घरगुती गॅस तसेच पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पेट्रोल पंपावर, गॅस वितरक यांचे कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच गॅस सिलेंडरचा अनावश्यक वापर व साठा करू नये. गॅस कंपन्याकडूनच वरीलप्रमाणे प्रणालीत बदल केले असलेने गॅस वितरण करणारे व्यक्ती अथवा ड्रायव्हर यांच्याशी अकारण वाद घालू नये.

युध्दजन्य परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकणारी इंधन टंचाई आणि घरगुती एलपीजी गॅसचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष निर्देश निर्गमित केले आहेत. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यामध्येही घरगुती गॅसच्या अनधिकृत वापराला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुकास्तरावर धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष 'दक्षता पथके' तैनात करण्यात आली आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल, ढाबे, व्यावसायिक आस्थापना किंवा औद्यो गिक कारणांसाठी करता येणार नाही. अशा ठिकाणी पथकांमार्फत अचानक तपासणी करून सिलिंडर जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अवैध वापरत असलेले 11 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनाही त्यांच्या वितरणात पारदर्शकता ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या साठ्याची नियमित तपासणी तालुका पथकांकडून केली जाईल. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर 'जीवनावश्यक वस्तू कायदा' अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

घरगुती गॅसचा वापर केवळ विहित कारणांसाठीच करावा. गॅसचा काळाबाजार किंवा अवैध वापर होत असल्याचे आढळल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. गॅसची बचत हाईल अशा पध्दतीने जपून वापर करावा तसेच अन्य पर्याय जसे की सौर तसेच विद्युत उर्जेच्या उपकरणांचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande