लातूर - जळकोट पंचायत समितीची विभागीय पथकाकडून तपासणी
लातूर, 13 मार्च (हिं.स.)। पंचायत समिती कार्यालयात शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर शंभर टक्के होतो का नाही हे पाहण्यासाठी भाषा संचालनालय विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी नगर कार्यालयाकडून सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब उत्तमराव जगताप, अधिक्षक लक्ष्म
पंचायत समिती


लातूर, 13 मार्च (हिं.स.)। पंचायत समिती कार्यालयात शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर शंभर टक्के होतो का नाही हे पाहण्यासाठी भाषा संचालनालय विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी नगर कार्यालयाकडून सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब उत्तमराव जगताप, अधिक्षक लक्ष्मण बाबुराव जाधव, अनुवाद महेश लगड, वरिष्ठ लिपीक दिलीप भागवत लादे, या पथकातील अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आली.

या पथकातील अधिकाऱ्याकडून जळकोट पंचायत समिती कार्यालयातील तपासणीमध्ये आवक जावक नोंदवही, लेखा विभागातील सर्व नोंदवह्या, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे हजरीपट, सर्व प्रकारच्या रजा, अर्ज, रजा मंजूर, केलेल्या मंजुरी आदेश, सर्व प्रकारचे आवाहल, व कार्य बीवरणे, तसेच कामकाज सादर करण्यास मदत, पत्रावर दिलेले आदेश, केलेल्या सुचना, व शेरे, कार्यालयात प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव व त्या संबधिच्या कार्यालयांची टिप्पणी, कार्यालयाचा नामफलक, सुचना फलक, कार्यालयातील अधिकाऱ्यांचे कार्य असणारे नामफलक, सदरील कार्यालयातील अधिकारी यांच्या टेबलवरील नेमप्लेट, कार्यालयात वापरले जाणारे रबरी ठसे, व मुद्रा, हे सर्व मराठी भाषेत आहेत का यांची तपासणी व पाहणी यावेळी संबधित पथकाकडून करण्यात आली.

छत्रपती संभाजी नगर येथून आलेल्या पथकामध्ये सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब उत्तमराव जगताप, अधीक्षक

महेश लगड अनुवादक, दिलीप भागवत लादे, वरिष्ठ लिपीक, यांनी जळकोट पंचायत समिती कार्यालयातील कार्यालयीन दैनंदिन कामकाज मराठी भाषेचा वापराबाबतचे अभिलेखाची तपासणी करून आढळून आलेल्या त्रुटी बाबत सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब उत्तमराव जगताप यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा गौरव दिन, राजभाषा मराठी दिन, व वाचना प्रेरणा दिन, पंचायत समिती कार्यालयात साजरा करण्यांचा सुचना यावेळी त्यांनी दिल्या. तसेच सर्व अधिकार व कर्मचारी यांनी या पुढील काळात त्यांची स्वाक्षरी ही मराठी भाषेतच करावे, याबाबत सुचना दिल्या आहेत.

यावेळी जळकोट पंचायत समिती चे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे, वरिष्ठ सहाय्यक नितीन मुस्कावाड, अरविंद पाटील, राजश्री स्वामी, कनिष्ठ सहाय्यक सुनील तोडसाम, शेख मौनोदीन, सोमेश्वर डंबाळे, शांतवीर कासनाळे, आदी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande