
परभणी, 13 मार्च (हिं.स.)।
सेलू तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, राज्यपुरस्कृत योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) पडताळणी व आधार प्रमाणीकरणासाठी दि. 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता तहसिल कार्यालय, सेलू येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांनी अद्याप यूडीआयडी कार्डची पडताळणी व आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी मूळ यूडीआयडी कार्ड, ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्र व आधारकार्ड सोबत घेवून तहसील कार्यालय, सेलू येथील संजय गांधी निराधार योजना विभागात उपस्थित रहावे. तसेच आधारकार्डला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक सोबत ठेवावा. सदर कॅम्पमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभाग घ्यावा, जेणेकरून कोणताही लाभार्थी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन तहसीलदार सेलू यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis