उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी
सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। उजनी धरणात सध्या ९५.७० टीएमसी पाणी आहे. सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. शेतीपिकांसाठी दोन-तीन दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून २० मार्चनंतर सलग ८० दिवस डाव्या व उजव्या कालव्यात
ujani dam news


सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। उजनी धरणात सध्या ९५.७० टीएमसी पाणी आहे. सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. शेतीपिकांसाठी दोन-तीन दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून २० मार्चनंतर सलग ८० दिवस डाव्या व उजव्या कालव्यातून, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडले जाणार आहे. पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होणार आहे.उन्हाळ्यातील शेतीच्या आवर्तनासाठी उजनीतून जवळपास साडेआठ टीएमसी पाणी सोडावे लागते. दुसऱ्या आवर्तनासाठी सात-साडेसात टीएमसी पाणी लागते. तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून चार टीएमसीची (प्रत्येकी दोन टीएमसी) दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. मात्र, भीमा नदीतून मार्चऐवजी एप्रिलअखेर पाणी सोडले जाऊ शकते. दरम्यान, दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये पाणी सोडल्यानंतर मे महिन्यात उजनी धरण हमखास उणे पातळीत जायचे. धरण उणे २० टक्के झाल्यावर दोन्ही कालव्यातून (कॅनॉल) पाणी सोडणे बंद होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande