रत्नागिरीत 16 मार्च रोजी महिला लोकशाही दिन
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : मार्च महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय मह
रत्नागिरीत 16 मार्च रोजी महिला लोकशाही दिन


रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : मार्च महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे.

जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुसार जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांच्या वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande