गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित; प्रशासनाचे आवाहन
अमरावती, 14 मार्च (हिं.स.) महिलांमध्ये वाढणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रभावीपणे रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ''जिल्हास्तरीयएचपीव्हीलसीकरण'' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नुकतेच आष्टी येथील प्राथमिक आरोग्य कें
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित; प्रशासनाचे आवाहन


अमरावती, 14 मार्च (हिं.स.)

महिलांमध्ये वाढणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रभावीपणे रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 'जिल्हास्तरीयएचपीव्हीलसीकरण' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नुकतेच आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे आणि जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. प्रवीण पारिसे यांनी सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचे आणि अफवांचे खंडन केले. त्यांनी स्पष्ट केले की, कोणतीही लस सर्वसामान्यांना देण्यापूर्वी तिच्या अनेक स्तरांवर कठोर वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात आणि ही लस सर्व निकषांवर यशस्वी ठरली आहे. त्यामुळे पालकांनी कोणत्याही निराधार अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींच्या पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे सांगण्यात आले असून, ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून कायमचे संरक्षण मिळवून देते. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण खराटे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य गजभिये, डॉ. निखिल उप्पलबार, डॉ. गीतांजली लखदिवे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय आरोग्य पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जास्तीत जास्त मुलींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande