अंगणवाड्यांमध्ये १५ दिवसांचा गॅससाठा; सेविकांवर वाढता ताण
पुणे, 14 मार्च (हिं.स.)। गॅस सिलिंडर तुटवड्याचा परिणाम हा राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांकडे सध्या साधारण पंधरा दिवस पुरेल इतकाच गॅससाठा उपलब्ध आहे. परिस्थिती लक्षात घेऊन एकात्मिक बाल विकास सेवा
gas


पुणे, 14 मार्च (हिं.स.)। गॅस सिलिंडर तुटवड्याचा परिणाम हा राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश जिल्ह्यांकडे सध्या साधारण पंधरा दिवस पुरेल इतकाच गॅससाठा उपलब्ध आहे. परिस्थिती लक्षात घेऊन एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाने पर्यायी नियोजन सुरू केले आहे.

राज्यात एक लाख १० हजार ६३१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, या केंद्रांमधून दररोज ६६ लाख ५९ हजार ६५० बालकांना पोषण आहार दिला जातो. केंद्रांपैकी सुमारे ६५ ते ७० टक्के ठिकाणी स्वयंपाकासाठी गॅसचा वापर केला जातो. त्यामुळे गॅसपुरवठा नियमित राहणे आवश्यक मानले जात आहे.

आयुक्तालयाकडून सध्याच्या गॅस परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माहिती मागविण्यात आली. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. बालकांच्या पोषण आहारावर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. साधारण पुढील पंधरा दिवस पुरेल एवढा गॅस उपलब्ध असून, पुढील उपाययोजना करण्यात येतील. असे पुणे महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारीआनंद खंडागळे यांनी सांगितले .

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande