महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज
छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील १० स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १८ ते २५ मार्चदरम्यान अर्ज उपलब्ध होणार असून २४ ते ३० मार्चदरम्यान
महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज


छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील १० स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १८ ते २५ मार्चदरम्यान अर्ज उपलब्ध होणार असून २४ ते ३० मार्चदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १ एप्रिल रोजी आयुक्तांच्या दालनात अर्जांची छाननी होणार आहे. स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्तीसाठी शिक्षण, कायदा, अभियांत्रिकी, लेखा, सामाजिक कार्य किंवा प्रशासकीय क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. दरम्यान, या पदांसाठी इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. छाननीनंतर प्रस्ताव महापौरांकडे पाठवला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande