रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांचे बँक व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलन
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : बँक ऑफ इंडियामधील फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन या संघटनेने आपले प्रलंबित असलेले प्रश्न तडीस नेण्यासाठी बँक व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलनात्मक कार्यक्रम घोषित केला आहे. आंदोलनाची सुरुवात १७ मार्च २०२६ रोजी सु
रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांचे बँक व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलन


रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : बँक ऑफ इंडियामधील फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन या संघटनेने आपले प्रलंबित असलेले प्रश्न तडीस नेण्यासाठी बँक व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलनात्मक कार्यक्रम घोषित केला आहे. आंदोलनाची सुरुवात १७ मार्च २०२६ रोजी सुरू होईल.

हे आंदोलन व संप पुढील मुद्द्यांवर असेल : १) ग्राहकांना चांगल्या व उत्तम प्रकारे सेवा देता यावी यासाठी क्लार्क, शिपाई व आर्मगार्ड यांची पुरेशा प्रमाणात भरती करावी. २) बँकेने कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग करू नये. ३) बँकेने रोजंदारी काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी. ४) बँकेने औद्योगिक विवाद कायद्याचे उल्लंघन करू नये. तो पाळणे आवश्यक आहे. ५) बँक व्यवस्थापन व संघटना यामध्ये १५ नोव्हेंबर २०१४ व २७ डिसेंबर २०२१ रोजी अंतर्गत समझोता करार झालेला आहे. त्याचे उल्लंघन न करणे, त्याचे वचन पाळणे व वितरण करणे. ६) बँक व्यवस्थापनाने कामगारविरोधी धोरण राबवू नये. ७) बँकेला होणाऱ्या नफ्यातील वाटा काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना देण्यात यावा.

पहिल्या दिवशी संपूर्ण देशभर झोनल ऑफिससमोर मास निदर्शने करण्याचे ठरले आहे. दि. २४ मार्च २०२६ रोजी संपूर्ण देशभर झोनल ऑफिससमोर धरणे आंदोलन होईल, तर ३० मार्च २०२६ रोजी देशव्यापी संप जाहीर केला आहे.

संपाच्या दिवशीही देशभर बँक ऑफ इंडियाच्या सर्व झोनल ऑफिससमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

तिन्ही दिवशी संघटनेमार्फत दिवशी रत्नागिरीच्या बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसच्या आवारात निदर्शने करण्यात येणार आहेत. अशी माहिती बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे अध्यक्ष विनोद कदम यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande