जातिवार जनगणना व ओबीसी हक्कांसाठी भारत मुक्ती मोर्चाद्वारे 23 मार्च रोजी जिल्हा मुख्यालयांवर मोर्चा
परभणी, 14 मार्च (हिं.स.)। जातिवार जनगणना, ओबीसी हक्कांचे संरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी भारत मुक्त मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा यांच्या वतीने राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकारी यांच
जातिवार जनगणना व ओबीसी हक्कांसाठी भारत मुक्ती मोर्चाद्वारे 23 मार्च रोजी जिल्हा मुख्यालयांवर मोर्चा


परभणी, 14 मार्च (हिं.स.)।

जातिवार जनगणना, ओबीसी हक्कांचे संरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी भारत मुक्त मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा यांच्या वतीने राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र जातिवार स्तंभ समाविष्ट करावा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसींसाठी कठोर विद्यापीठ अनुदान आयोग समानता नियम लागू करावेत तसेच 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. भारत मुक्त मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने देशभर टप्प्याटप्प्याने आंदोलन राबविण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार 23 मार्च रोजी जिल्हा मुख्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार असून 23 एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बबनराव भंडारे, बालासाहेब जगधे, अॅड. विनोद आवरे, सुभाष भाळवे साडेगावकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande