
छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापती पदी सुनिता संजय साळुंके यांची निवड झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी साळुंके यांचा सत्कार केला यावेळी बोलताना सावे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहरातील आरोग्य सेवांना अधिक बळ देत नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच त्यांच्या माध्यमातून सकारात्मक कार्य घडेल, हा विश्वास आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis