रत्नागिरी : चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे १९ मार्चला उद्घाटन
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : दी चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडचे प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन बुधवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत य
चिपळूण अर्बन बँक इमारत


रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : दी चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडचे प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन बुधवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे.

उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, सहकार जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहन बाळकृष्ण मिरगल, उपाध्यक्ष धनंजय अशोक खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम गुलाबराव सूर्यवंशी, तसेच संचालक मंडळ व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande