
देवगावकर हॉस्पिटलने डायलीसिस रुग्णांसोबत साजरा केला किडनी दिवस
नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।
: बदलत्या जीवनशैलीमुले व मधुमेहाचे प्रमाण वाढल्यामुळे किडनीविकारा मध्ये वाढ होत आहे. अनेक रुग्णांमध्ये किडनी प्रत्यारोपण चे प्रमाण वाढले आहे. परंतु समाजामध्ये किडनी डोनेट करण्याविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे डोनर पुढे येत नाही. त्यामुळे गैरसमज दूर करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक महानगर पालिकेचे उपमहापौर विलास शिंदे यांनी केले.
जागतिक किडनी दिनानिमित्त गोल्फ क्लब येथे आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक शाहू खैरे, माजी महापौर अड यतीन वाघ, मधुमेह तज्ज्ञ डॉ. नारायण देवगावकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली देवगावकर उपस्तित होते.
यावेळी डायलेसिस रुग्णांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किडनीसाठी चालूया हा संदेश यावेळी उपस्तीतांना देण्यात आला.
नगरसेवक शाहू खैरे म्हणाले की, समाजात किडनी दान केलेल्या दात्यानी पुढे आले पाहिजे व एका किडनीवर व्यवस्थित जीवन जगू शकतो असा संदेश समाजाला देणे व त्याविषयी जनजागुती करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. पार्थ देवगावकर यांनी सांगितले नेहमी पोटात दुखणे, लघवी कमी होणे/ साचून राहणे, लघवीतून रक्त किंवा फेस येणे, वारंवारं लघवीत संसर्ग होणे, अंगावर किंवा पायावर सूज येणे, लघवीला जळजळ होणे, उच्च रक्तदाब या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन निदान करणे गरजेचे असते. विशेषत: किडनीविकारात उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून दैनंदिन पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV