अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय खास उष्माघात कक्ष तयार
* काम नसल्यास उगाच उन्हात न फिरण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन अमरावती, 14 मार्च (हिं.स.) अमरावती सह विदर्भात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. एकूणच वातावरणात निर्माण झालेली धग आणि बदल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास प्रारंभ केला असून
जिल्ह्या सामान्य रुग्णालय खास उष्माघात कक्ष तयार काम नसल्यास उगाच उन्हात न फिरण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन


* काम नसल्यास उगाच उन्हात न फिरण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

अमरावती, 14 मार्च (हिं.स.)

अमरावती सह विदर्भात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. एकूणच वातावरणात निर्माण झालेली धग आणि बदल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास प्रारंभ केला असून त्या अंतर्गत अमरावती जिल्ह्या सामान्य रुग्णालय व जिल्ह्य़ात बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये खास उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून अमरावती शहरासह विदर्भातील विविध जिल्ह्य़ात तापमानाने उचांक गाठायला सुरुवात केली आहे गेल्या चार पाच दिवसांपासून सकाळी नऊ वाजतापासून उन्हाचा तडाखा जाणवायला लागतो. दुपारी १२ वाजतानंतर अनेक रस्ते सानसून दिसतात. विदर्भात अमरावती चंद्रपूर, अकोला, वर्धा, या शहरांत ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या वर तापमान पोहोचले आहे. एप्रिल मे महिन्यात आणखी उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

वाढत्या तापमानाच्या पाश्र्वभूमीवर विविध जिल्हा शासकीय रुग्णालयांत आरोग्य विभागाने स्वतंत्र उष्माघात कक्षांची स्थापना केली आहे.

उष्माघात होऊ नये म्हणून नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात

शीत वॉर्ड तयार करण्यात आले. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे, जल संजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, अधून-मधून सावलीमध्ये विश्रांती घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. थकवा, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, चक्कर येणे, डोके दुखणे, मानसिक बैचेनी व अस्वस्थता वाटणे, बेशुद्ध अवस्था आदी उष्माघाताची लक्षणे आहेत. कोणत्याही व्यक्तीस अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने

रुग्णास सामान्य रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande