रत्नागिरी परिमंडलात 18 कोटी 66 लाखांची वीजबिल थकबाकी
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 18 हजार 237 ग्राहकांकडे 18 कोटी 66 लाख रुपय
रत्नागिरी परिमंडलात 18 कोटी 66 लाखांची वीजबिल थकबाकी


रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 18 हजार 237 ग्राहकांकडे 18 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

थकबाकीमुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडलांतर्गत 2 हजार 518 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती 1 लाख 01 हजार 292 ग्राहकांकडे 09 कोटी 41 लाख, व्यावसायिक 10 हजार 566 ग्राहकांकडे 3 कोटी 65 लाख, औद्योगिक 1 हजार 548 ग्राहकांकडे 3 कोटी 10 लाख, सार्वजनिक सेवा 4 हजार 520 ग्राहकांकडे 2 कोटी 27 लाख आणि इतर वर्गवारीतील 311 ग्राहकांकडे 25 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात 28 हजार 726 ग्राहकांकडे 03 कोटी 76 लाख, चिपळूण विभागात 13 हजार 778 ग्राहकांकडे 2 कोटी 06 लाख, खेड विभागात 15 हजार 680 ग्राहकांकडे 02 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 01 हजार 721 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात 27 हजार 631 ग्राहकांकडे 04 कोटी 71 लाख, कुडाळ विभागात 32 हजार 422 ग्राहकांकडे 05 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 797 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे.

थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रकमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. याव्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande