कागलमध्ये 6 लेनसह ₹357.99 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर - नितीन गडकरी
कोल्हापूर, 14 मार्च (हिं.स.)।कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे. ₹357.99 कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून उद्योग व मालवाहत
कागलमध्ये 6 लेनसह ₹357.99 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर - नितीन गडकरी


कोल्हापूर, 14 मार्च (हिं.स.)।कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे. ₹357.99 कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून उद्योग व मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणाऱ्या या निर्णयाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली.

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग-४८ हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल (GQ) महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून तो दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे ५-स्टार एमआयडीसी (MIDC) औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात व्यापार व उद्योग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असून प्रचंड वाहतूक कोंडी व प्रदूषणातही वाढ होत आहे. याचा परिणाम आपातकालीन सेवांवर देखील होत आहे.

उपरोक्त मंजूर करण्यात आलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब अंतराची जलद वाहतूक वेगळी होणार असून स्थानिक वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी व मालवाहतुकीसाठी गतीमान व सुरक्षित प्रवास शक्य होईल. तसेच इंधन बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होईल. परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

या उन्नत महामार्गामुळे या भागातील उत्पादकता वाढेल, आर्थिक सुबत्ता वाढेल व आपातकालीन सेवा कार्यक्षमतेने पुरवता येतील. यामुळे देशांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande