परभणी - जलमित्र संघटनेच्या अध्यक्षपदी इंजि. शंकर आजेगावकर
परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। जिल्ह्यातील पाणी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जलमित्र संघटनेच्या अध्यक्षपदी इंजि. शंकर आजेगावकर तर सचिवपदी प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील कालानी रुग्णालयातील कार्यालयात झालेल्या
Q


परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। जिल्ह्यातील पाणी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जलमित्र संघटनेच्या अध्यक्षपदी इंजि. शंकर आजेगावकर तर सचिवपदी प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

येथील कालानी रुग्णालयातील कार्यालयात झालेल्या संघटनेच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजगोपाल कलानी होते. या बैठकीस विलास देशपांडे, रुस्तुम सरांडे, रावसाहेब देशमुख, प्रवीण तापडिया, तिळकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जलमित्र संघटना मागील पंधरा वर्षांपासून पाणी बचत, पाण्याविषयी जनजागृती, जल पुनर्भरण, नाला सरळीकरण तसेच जलसंधारणाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत आहे. संघटनेच्या माध्यमातून कोल्हा येथील जलसंधारण कामे, भोगाव येथील तलावाची व्याप्ती वाढविणे व सुधारणा, गाळ काढणे तसेच परभणी शहरातील गुजरी बाजार येथील बंद पडलेल्या विहिरीचे पुनरुज्जीवन अशी महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली आहेत. याशिवाय विद्यार्थी, शाळा-महाविद्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येतात.

नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीत मावळते अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी इंजि. शंकर आजेगावकर यांच्या नावाचा ठराव मांडला, तर मावळते सचिव आनंद पोहेनरकर यांनी सचिवपदासाठी प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या नावाचा ठराव मांडला. उपस्थित सदस्यांनी या दोन्ही ठरावांना एकमताने मंजुरी दिली. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. ही निवड पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande