पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे केले जाणार
पुणे, 14 मार्च (हिं.स.)। पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे केले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) १०४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. प्रशासनाने याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारला सादर के
express


पुणे, 14 मार्च (हिं.स.)। पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे केले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) १०४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. प्रशासनाने याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारला सादर केला. एप्रिलमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

या द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंनी दोन अतिरिक्त मार्गिका केल्या जाणार असून, त्यासाठी सुमारे १४ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. बांधा, वापरा व हस्तांतर (बीओटी) या तत्त्वावर मार्गिका वाढविण्याचे काम केले जाणार आहे.पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी यामुळे ‘एमएसआरडीसी’ प्रशासनाने या मार्गावर मार्गिकेची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचा अहवाल तयार करून तो प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande