
सोलापूर, 14 मार्च (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्यामध्ये दररोज 250 मे. टन घरगुती गॅस, तर 10 मे. टन व्यावसायिक गॅसची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर गॅसपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी केवळ आठ ते दहा दिवस इतकाच गॅसपुरवठा होईल, इतकाच साठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी बैठक घेतली.या बैठकीत एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल कंपनीच्या प्रतिनिधी यांच्याकडून सांगण्यात आले की, घरगुती गॅस सिलिंडरचा किमान आठ ते दहा दिवसांचाच साठा उपलब्ध आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा अत्यावश्यक सेवांसाठी मागणीप्रमाणे उपलब्ध केला जाणार आहे. कंपन्यांकडून जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे उपलब्ध केला जात असल्याने घरगुती गॅस सिलिंडरची कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याची माहिती एचपीसीएलचे प्रतिनिधी विनोद कुमार यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड