रत्नागिरी : हिंदू नववर्षानिमित्त मालगुंड पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे कीर्तनसंध्या
रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : मालगुंड पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे हिंदू नववर्षानिमित्त दि. १९ मार्च व २० मार्च रोजी कीर्तनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजता मालगुंड येथील दत्तमंदिरात पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार
रत्नागिरी : हिंदू नववर्षानिमित्त मालगुंड पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे कीर्तनसंध्या


रत्नागिरी, 14 मार्च, (हिं. स.) : मालगुंड पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे हिंदू नववर्षानिमित्त दि. १९ मार्च व २० मार्च रोजी कीर्तनसंध्या आयोजित करण्यात आली आहे.

दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजता मालगुंड येथील दत्तमंदिरात पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप हरिहर श्रीपाद नातू यांची दोन सुश्राव्य कीर्तने होणार आहेत. श्री. नातू शहीद भगतसिंग व संत ज्ञानेश्वर : संजीवन समाधी या दोन विषयांवर कीर्तने करणार आहेत.

श्री. नातू यांना तबलासाथ प्रथमेश शहाणे, संवादिनी साथ चैतन्य पटवर्धन, पखवाज साथ केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, ध्वनी सहाय्य विजय घाणेकर करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande