
लातूर, 14 मार्च, (हिं.स.) : उदगीर शहरातील होंन्डा शोरुमच्या समोर नांदेड - बिदर रस्त्यावर घडलेल्या अपघातात जखमी झालेल्या नागरिकाला मदत करण्यासाठी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी तातडीने पुढाकार घेवुन मानवतेचे उदाहरण घालून दिले. मतदार संघाचा दैनंदिन दौरा करत असताना उदगीर शहरातुन देवणीकडे कार्यक्रमास्थळी माजी मंत्री आ.संजय बनसोडे जात होते. रस्त्यावर अचानक अपघात झाला असल्याचे आ.संजय बनसोडे यांच्या निर्देशनास आले व त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला. घटनास्थळी भेट देवुन जखमीची विचारपूस करुन स्वत:ची गाडी देवून अपघातग्रस्त नागरिकाला त्यांच्या अंगरक्षकासोबत रूग्णालयात पाठवुन त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली.
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अपघातग्रस्तांना दिलेल्या या तातडीच्या मदतीमुळे नागरिकांकडून आ.संजय बनसोडे यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis