
छत्रपती संभाजीनगर, 14 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. तथापि,शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा मध्यान्न पोषण आहार, आदिवासी विकास विभागाची, सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहाची तसेच आश्रमशाळांची भोजनालये, रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या अन्नपदार्थांसाठी स्वयंपाकाचा गॅस अविरत उपलब्ध ठेवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी गॅस वितरण कंपनीला दिले. हे वितरण सुरळीत सुरु रहावे याबाबत पुरवठा विभागाने देखरेख ठेवावी,असेही निर्देश त्यांनी दिले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis